Sudhir Tambe: सुधीर तांबेंची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी? महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या नेत्यांची मोर्चेबांधणी

शिस्तभंगाची कारवाई केलेल्या सुधीर तांबेंना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या नेत्यांची मोर्चेबांधणी
Sudhir Tambe
Sudhir TambeEsakal

सुधीर तांबे यांचं काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आलं होतं. उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे सुधीर तांबे यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली होती. सुधीर तांबे हे सत्यजित तांबे यांचे वडील आहेत. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले आहे. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवारी सुधीर तांबे यांना देण्यात आली होती. पंरतु,त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला नाही. उलट त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळं काँग्रेसने त्यांच्याविरोधात कारवाई करत निलंबनाची कारवाई केली होती.

Sudhir Tambe
Dasra Melava: शिवाजी पार्कवर घुमणार उध्दव ठाकरेंचा आवाज! दसरा मेळावा घेण्यास अखेर ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने दिला ग्रीन सिग्नल

दरम्यान शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या सुधीर तांबेंना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिल्यानंतरही तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांना अपक्ष निवडून आणलं. यामुळे सुधीर तांबेंवर १५ जानेवारीला तारिक अन्वर यांनी कारवाई केली होती.

Sudhir Tambe
Metro Car Shed: सरकार नसताना विरोध अन् आता मंजूरी; कांजूरमार्ग मेट्रोशेडला शिंदे-फडणवीस सरकारचा ग्रीन सिग्नल

मात्र, आता अहमदनगर व उत्तर महाराष्ट्रातून पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी दोन महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बोलणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्षांकडून कोणत्याही ग्रीन सिग्नल न आल्याने संबंधित नेत्यांची दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

त्यामुळे तांबेंवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार का? पुन्हा एकदा त्यांना पक्षात स्थान दिलं जाणार का? किंवा त्यांना दुसरी कोणती जबाबदारी देण्यात येणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Sudhir Tambe
Israel-Hamas War: पाकिस्तानच्या पासपोर्टवर इस्त्राइल बद्दल काय लिहिले आहे ? समजले तर तुम्हालाही बसेल धक्का !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com