नगर जिल्ह्यात आज आढळले २१ कोरोनाबाधित

अशोक मुरुमकर
Thursday, 9 July 2020

अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण दिवसांदिवस वाढत आहेत. गुरुवारी (ता. ९) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर ग्रामीणमध्ये : ६, नगर मनपा : ३, श्रीरामपूर तालुका : २, नेवासा तालुका : २, अकोले तालुका : १, संगमनेर : १, श्रीगोंदा तालुका : १, राहुरी तालुका : १, जामखेड तालुका : २, भिंगार : १ आणि कर्जत तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण दिवसांदिवस वाढत आहेत. गुरुवारी (ता. ९) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर ग्रामीणमध्ये : ६, नगर मनपा : ३, श्रीरामपूर तालुका : २, नेवासा तालुका : २, अकोले तालुका : १, संगमनेर : १, श्रीगोंदा तालुका : १, राहुरी तालुका : १, जामखेड तालुका : २, भिंगार : १ आणि कर्जत तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

४३ जणांचे स्वॉब तपासण्यासाठी

कर्जत : तालुक्यातील जळगाव (माही) येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील एक व्यक्ती युवती कोरोना पॉझिटिव्ह निघाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली. त्यामुळे कर्जत तालुक्यातील रुग्णाची संख्या आता १३ झाली आहे. प्रशासन या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत असून कर्जत तालुक्यातील (माहि) जळगाव व पाटेगाव येथील दोन दिवसापूर्वी सापडलेल्या दोन कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील ४२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 36 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. तर सहा रुग्णांचे रिपोर्ट येणे बाकी होते. यातील एका युवतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली असून लोकांनी स्वयंशिस्त पाळत शासनाचे नियम पाळावेत व खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सादर कोरोना पॉझिटिव्ह हा महावितरणचा खासगी कर्मचारी असून त्याच्या घरून शाखा अभियंत्याल जेवणाची मेस होती ती माहिती समोर आली आहे.या बाबत प्रशासन अधिक माहिती घेत आहे.

माहिजळगावमध्ये दिलासा
माहिजळगाव आणि पाटेगाव एक एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. प्रशासनाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या 42 व्यक्तींचे स्वॉब तपासणी करीता पाठविण्यात आले होते. ते अहवाल प्राप्त झाला असून त्यात माहिजळगाव येथील १६ पैकी १३ आणि पाटेगाव येथील २६ पैकी २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. यामुळे काळजीत असलेली ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला असून अजून सहा जणांच्या अहवालाची प्रतीक्षा कायम असून धाकधूक वाढली आहे.
राशीन, सिद्धटेक येथे रुग्ण बाहेरून आल्याची हिस्ट्री होती. मात्र माहिजळगाव व पाटेगावातील कोरोनाबाधित रुग्णांनी आम्ही बाहेर गेलोच नाहीत, असे सांगित आहेत. त्यामुळे प्रशासन व ग्राम समिती चक्रावून जात सतर्क झाली होती. हे दोन्ही रुग्ण गावातील काही डॉक्टरांच्या व पॅथॉलॉजीकल लॅबच्या संपर्कात आल्याने त्यात अजून भर पडली होती. यामुळे दोन्ही गावातील जनजीवन विस्कळीत होत कोरोना ग्राम समितीच्या वतीने तीन दिवस कडकडीत बंद ठेवत जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता. संबंधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला होता. मात्र हे अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन्ही गावातील गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today 21 corona affected found in Nagar district