Successful Rescue Operation After Tourists Lose Way on Hill

Successful Rescue Operation After Tourists Lose Way on Hill

sakal

पर्यटकांची सुखरूप सुटका! १५ पर्यटक डोंगरावर रात्रभर अडकून पडले, अंधार पडला अन् उतरण्याचा मार्ग सापडेना, नेमकं काय घडलं..

Safe Evacuation After Tourists Stuck Due to lost Route: अंधारात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका, राजूर पोलिसांची तत्परता
Published on

राजूर : अकोले तालुक्यातील पर्यटनस्थळे नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतात. सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. शनिवार-रविवारची सुटी असल्याने मुंबईहून आलेले सुमारे १५ पर्यटक कुमशेत येथील आजोबा डोंगरावर शनिवारी भ्रमंतीसाठी गेले होते. मात्र उशीर झाल्याने अंधार पडला आणि उतरण्याचा मार्ग न सापडल्याने पर्यटक डोंगरावर अडकून पडले होते. राजूर पोलिसांनी या पर्यटकांची आज सकाळी सुटका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com