esakal | पाथर्डीकरांची कोंडी; ठेकेदारानी खोदला रस्ता, गटारीचे कामही १५ दिवसांपासून बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic jam in Pathardi town due to road works

राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराने शहरातुन जाणारा रस्ता खोदुन ठेवला आहे. गटाराचे कामही १५ दिवसापासुन बंद पडले आहे.

पाथर्डीकरांची कोंडी; ठेकेदारानी खोदला रस्ता, गटारीचे कामही १५ दिवसांपासून बंद

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराने शहरातुन जाणारा रस्ता खोदुन ठेवला आहे. गटाराचे कामही १५ दिवसापासुन बंद पडले आहे. शहरात रस्त्याच्या एकाच बाजुने ये- जा करणाऱ्या वाहनामुळे वाहतुकीची कोंडी होऊन सणाच्या निमीत्ताने घराबाहेर पडलेले वाहन धारक अर्धा तास वाहतुककोंडीत सापडत आहेत. 

रस्त्याच्या बाजुला अवैध वाहतुक करणा-या जिपगाड्या व काही दुचाकी वाहने यामुळे वाहतुकीची कोंडी रोजच वाढत आहे. पोलिस मात्र यागोष्टीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. रस्त्यात खोदकाम केल्याने धुळीमुळे अनेकांना घशाचा त्रास वाढला आहे. ठेकेदाराने रोज रस्त्यावर पाणी मारणे गरजेचे आहे. मात्र तसे केले जात नाही. आम्ही लोकप्रतिनिधीच्या मार्फत काम मिळविले आहे. आमचे कोणी काही करु शकत नाही असी ठेकेदाराचे माणस सांगतात. 

शहरातील पोळा मारुती मंदीर ते डॉ.बाबासाहेब आबेंडकर चौक येथील रस्ता एका बाजुने खोदला आहे. तेथे गटारीचे काम सुरु केले आणि आठ दिवसात ते बंदही पडले. ठेकेदाराची सर्व यंत्रणा शहरात काम सुरु करुन गायब झाली आहे. शहरात रोज वाहतुक कोंडी होते. पोलिस मात्र चुकुनही तिकडे फिरकत नाहीत. एखादा वाहनधारक चुकीच्या बाजुने घुसला की वाहतुक ठप्प होते. धुळ तर इतकी आहे की माणसाला समोरचे वाहनही दिसत नाही. धुळीच्या त्रासामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्ता खोदल्याने रोज अपघाताची मालीका सुरु आहे. खोदलेल्या रस्त्याच्या बाजुने कुठेही फलक लावलेला नाही.

रस्ता एकाच बाजुने सुरु असल्याने वाहतुकीची कोंडी होते. डॉ.बाबासाहेब आबेंडकर चौकात पोलिस व होमगार्ड यांना नेमण्यात येईल. रस्त्याच्या काम होत नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही. रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनावर कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी म्हणाले.

नगरसेवक महेश बोरुडे म्हणाले, शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. रस्ता खोदुन ठेवला मग काम बंद का केले. ठेकेदाराने कुठेही सावधानते बाबत फलक लावलेले नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी नगरला राहतात. केवळ एक कर्मचारी त्यालाही काही अधिकार नाहीत. काम बंद का पडले आहे. कोणीही याकडे लक्ष देत नाहीत. काम सुरु करावे. रोज रस्त्यावर पाणी मारावे धुळ कमी होईल.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top