नगर- पुणे महामार्गाने प्रवास करताय ? वाचा, महत्त्वाची बातमी

सुर्यकांत वरकड
Wednesday, 30 December 2020

नगर जिल्ह्यातून पुणे रस्त्याने जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. हा आदेश 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 2 जानेवारी 2021 रोजी सकाळी सहापर्यंत लागू राहणार आहे. 

अहमदनगर : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभवरील कार्यक्रमानिमित्त पुणे रस्त्याने जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. तसा आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला.
 
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दतीतील पेरणे फाटा व भीमा कोरेगाव परिसरात एक जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभावरील कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सुचनेनुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातून पुणे रस्त्याने जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. हा आदेश 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 2 जानेवारी 2021 रोजी सकाळी सहापर्यंत लागू राहणार आहे. 

ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नगरवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक अशी :

बेलवंडी फाटा-देवदैठण-ढवळगाव-पिंपरी कोलंदर- उक्कडगाव-बेलवंडी-नगर-दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ-मढेवडगाव-काष्टी-दौंड-सोलापूर-पुणे रस्त्याने पुणे. 
केडगाव बाह्यवळण- अरणगाव बाह्यवळण- दौंड रस्तामार्गे कोळगाव-लोणी व्यंकनाथ-मढेवडगाव-काष्टी-दौंड-सोलापूर-पुणे मार्गे पुणे. दरम्यान, बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic on Pune Road has been diverted to Bhima Koregaon in Pune district on the occasion of Vijayasthambh program on January one