सोनई (अहिल्यानगर) - घोडेगाव (ता. नेवासे) येथे सुरु असलेल्या जलजीवन पाणी योजनेच्या साठवण तलावात बुडून तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे..घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी सोनई रस्त्यावर असलेल्या घटनास्थळी गर्दी केली होती. पाण्यातून पहिला मृतदेह बाहेर काढताच उपस्थित नातेवाईकांनी एकच टाहो फोडल्याने तेथील वातावरण भावनाविवश झाले. रिहान अन्वर शेख (वय-१०) हा विद्यार्थी बचावला आहे..आज सायंकाळी साडेचार वाजता चार मित्र पाणी साठवण तलावात पोहण्यास उतरले होते. यामध्ये प्रथमेश सुभाष काळे (वय-१७), जीवन रविंद्र आव्हाड (वय-१६) व शोएब आयुब शेख (वय-१७) सर्व राहणार घोडेगाव ठार झाले आहेत..पैकी रात्री आठ वाजेपर्यंत दोघांचे मृतदेह काढण्यात यश आले असून शोएब शेखचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापनचे सी आर भांगरे व पथक तसेच सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, फौजदार सुरज मेढे, पोलीस पथक व मदतनीस तळ ठोकून आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.