
सोनई : पुण्याजवळील गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियममध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सामना पाहून अतिशय आनंद आणि स्टेडियममधील फटकेबाजी बद्दल एकमेकात आनंद व्यक्त करत निघाले होते. जेवण अन् गप्पा झाल्यानंतर सर्वजण झोपले आणि एकदम मोठा आवाज झाला. आनंदी चेहऱ्यांचे रुपांतर रडण्यात व ओरडण्यात झाले. अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील उस्थळ दुमाला (ता. नेवासे) येथील किसनगिरीबाबा विद्यालयाच्या समोर झालेल्या अपघातात दोन उदयोन्मुख क्रिकेटपटू ठार झाले, तर इतर अकरा खेळाडू जखमी झाले आहेत.