
अकोले : शासकीय आश्रमशाळा मवेशी येथे इयत्ता आठवीत शिकत असलेल्या ईश्वरी महादू धिंदळे हिचा शुक्रवारी पहाटे नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. याबाबत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी नाशिक येथे जाऊन ईश्वरीच्या मृत्यूबाबत चौकशी केली. तसेच तिच्या नातेवाईकांना धीर दिला.