
खर्डा: नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी खर्डा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली.