शेवगाव, कर्जतमधील तहसीलदारांची बदली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कर्जत येथे नानासाहेब आगळे यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या छगन वाघ यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांना नियुक्तीचे स्थान दिले नाही. त्यांच्या कामाविषयी कर्जत तालुक्यात नाराजी होती.

नगर ः नाशिक विभागातील तहसीलदारांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार शेवगावच्या तहसीलदारपदी अर्चना भाकड-पागिरे यांची, तर कर्जत तहसीलदारपदी नानासाहेब आगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
भाकड यांनी जिल्हा प्रशासनात नायब तहसीलदार म्हणून पूर्वी कामकाज केले होते.

नायब तहसीलदार पदावरून तहसीलदारपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची नियुक्ती शेवगाव तहसीलदारपदी करण्यात आली आहे.

हेही वाचा - आदिवासी पाड्यातही शिरला कोरोना

या सोबतच कर्जत येथे नानासाहेब आगळे यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या छगन वाघ यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांना नियुक्तीचे स्थान दिले नाही. त्यांच्या कामाविषयी कर्जत तालुक्यात नाराजी होती. या सोबतच नाशिक विभागातील नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. यात राहाता तहसील कार्यालयात नायब तहसीलदार असलेल्या सचिन म्हस्के यांना तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे. त्यांची नेमणूक नंदूरबार येथील अक्कलकुवा येथे करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer of Tehsildar in Shevgaon, Karjat