दरवर्षी झाडे लावली जातात... पण झाडे लावण्याचे खड्डे तेच 

सनी सोनावळे 
Wednesday, 29 July 2020

दरवर्षी झाडे लावली जातात; पण झाडे लावण्याचे खड्डे तेच असतात, फक्त झाडे बदलतात. असे चित्र खूप वेळेस पाहायला मिळते.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : दरवर्षी झाडे लावली जातात; पण झाडे लावण्याचे खड्डे तेच असतात, फक्त झाडे बदलतात. असे चित्र खूप वेळेस पाहायला मिळते. म्हणून जसे झाड लावतो तसे त्याचे संवर्धन करून त्याला मोठे करण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून आपण केलेल्या वृक्षारोपणाची वृक्ष पुढच्या काळात रूबाबात डोलतांना आपल्याला पाहायला मिळेल.

पारनेर तालुक्‍यात सर्व प्रकाराचे झाडे लावुन वृक्षांची संख्या वाढविणार असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले. 

वडगाव दर्या (ता.पारनेर) येथील वडगाव दर्या देवस्थान परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अर्जुन गुंड, नामदेव परांडे, चंद्रभान ठुबे, किरण ठुबे, किशोर ठुबे, अंकुश ठुबे, संजय सोनावळे उपस्थित होते. 

आमदार लंके म्हणाले, दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदुषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागत आहे. म्हणून 'झाडे लावा झाडे जगवा' ही संकल्पना सगळीकडे राबवली जावे. परांडे म्हणाले,देवस्थान परीसरातील उजाड माळरानावर निसर्ग सौंदर्य वाढविण्यासाठी देवस्थान मार्फत विविध विकासकामे हाती घेतले आहे. बगीचा बनविण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree planting in Wadgaon Darya village in Parner taluka