-राजू नरवडे
संगमनेर : वर्षानुवर्ष उन्हाळ्यात टँकरचे पाणी प्यावे लागते, शेतीला पाणी नसल्याने शेती पडीकच असते, तर रोजंदारीसाठी बाहेर गावी जावे लागते. अशा कठीण परिस्थितीत केवळ जिद्द, चिकाटीच्या जोरावर कर्जुले पठार (ता. संगमनेर) येथील आदिवासी शेतकऱ्यांनी (Tribal Farmers) शेडनेटमध्ये अंजिराची बागा (Fig Garden) फुलविली आहे. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभिमान अर्थसाहाय्याने शेडनेटसाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे त्यांची यशोगाथा नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.