
Shendi tribals protest relocation of Raghoji Bhangre statue; market closed, sit-in staged at police station.
Sakal
अकोले: देवगाव येथील क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा पुतळा सुशोभीकरण करण्याचा नावाखाली संबंधित ठेकेदाराने कुणाचीही परवानगी न घेता हलविल्याचा आरोप करत देवगाव ग्रामस्थानी या घटनेचा निषेध करत थेट राजूर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. देवगाव व शेंडी येथील ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवत आक्रमक पवित्रा घेतला आहे.