
अहिल्यानगर : दिवाळीनंतर तुलसी विवाह जवळ आला असून, तुळशी विवाह आटोपल्यानंतर लग्नाचे बार उडण्यास प्रारंभ होतो. यंदा १२ नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी असून, दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे, तर १८ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होणार आहे. पुढील आठ महिन्यांत विवाहासाठी ५१ मुहूर्त आहेत. त्यामुळे या मुहूर्तावर शुभमंगल सावधानसह मंगलाष्टका ऐकायला मिळणार आहे.