ब्रेकींग : श्रीगोंदे स्टेशनजवळ मालगाडीचे बारा डबे घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प

संजय आ. काटे
Wednesday, 23 December 2020

श्रीगोंदे ते बेलवंडी स्थानकादरम्यान मालगाडीचे बारा डबे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घसरले. सिमेंट घेऊन जाणारी ही मालगाडी होती.

श्रीगोंदे (अहमदनगर) : श्रीगोंदे ते बेलवंडी स्थानकादरम्यान मालगाडीचे बारा डबे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घसरले. सिमेंट घेऊन जाणारी ही मालगाडी होती. 
त्यामुळे रेल्वेच्या या मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून हा मार्ग काही काळ बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर तेथे काम हाती घेतले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve coaches of a freight train collapsed near Shrigonde station