
राहुरी : गोटुंबे आखाडा येथे आज (गुरुवारी) सकाळी राहुरी पोलिसांनी सापळा लावून अवैधरित्या दुचाकीवरून देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी व देशी दारू बाटल्या असा ८७६८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.