
अहिल्यानगर: पाचशे रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा, चारचाकीसह सुमारे १७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर-सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी गावच्या शिवारात २७ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.