
अहिल्यानगर : जिल्ह्याच्या काही भागात आगामी दोन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व गारपीट होण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ८ मे २०२५ रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.