कंटाळा आला असला तरी नगरमध्ये आणखी दोन दिवस पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

यंदाच्या पावसाने जिल्ह्यातील सर्व मोठी धरणे भरली आहेत. सर्व मोठ्या नद्यांमधून विसर्ग सोडल्याने पूर आला आहे. नगर तालुक्‍यातील ससेवाडी, जेऊर, धनगरवाडी, आढाववाडी, पिंपळगाव माळवी, डोंगरगण परिसरात आज जोरदार पाऊस झाला.

नगर ः जिल्ह्यात आणखी दोन दिवस पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणखी दोन दिवस राहणार आहे. जिल्ह्यात आजही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. आजच्या पावसाने सीना नदीला पाणी आले होते. 

यंदाच्या पावसाने जिल्ह्यातील सर्व मोठी धरणे भरली आहेत. सर्व मोठ्या नद्यांमधून विसर्ग सोडल्याने पूर आला आहे. नगर तालुक्‍यातील ससेवाडी, जेऊर, धनगरवाडी, आढाववाडी, पिंपळगाव माळवी, डोंगरगण परिसरात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वांत मोठा पिंपळगाव माळवी तलाव पूर्ण क्षमतेने भरला. आज सायंकाळी सांडव्यातून पाणी बाहेर पडले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two days of rain in Ahmednagar