esakal | नगर-दौंड रस्त्यावरील अपघातात दोघे जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Two killed in Ahmednagar-Daund road accident Nagar news

नगरहुन दौंडच्या दिशेने जाणारा ट्रक घारगाव शिवारातील हॉटेल निलगिरी नजीक आला असता समोरून आलेल्या बोलेरोस धडकला.

नगर-दौंड रस्त्यावरील अपघातात दोघे जागीच ठार

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : नगर- दौंड महामार्गावरील घारगाव शिवारात काल (ता. सात) रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रक व बोलेरो या दोन वाहनांच्या अपघातात बोलेरोतील अशोक पुंजाबा औटी (वय 48), प्रभाकर निवृत्ती लोंढे (वय 57, रा. दोघेही नगर) या दोघांचा मृत्यू झाला. तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला.

नगरहुन दौंडच्या दिशेने जाणारा ट्रक घारगाव शिवारातील हॉटेल निलगिरी नजीक आला असता समोरून आलेल्या बोलेरोस धडकला. ही धडक एवढी जोराची होती की बोलेरोतील दोघे जागीच ठार झाले.

ही बोलेरो माथाडी कामगार मंडळाची असून या अपघातात माथाडी निरीक्षक प्रभाकर निवृत्ती लोंढे व वाहनचालक अशोक पंजाबा औटी यांचा मृत्यू झाला. बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

क्रेनच्या सहायाने दोन वाहने बाजूला करत त्यातील जखमी व मृतांना बाहेर काढले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहमदनगर

loading image