पावसाचा आणखी दोन दिवस धिंगाणा, प्रशासन म्हणतंय सावधान

Two more days of rain, Dhingana, administration says caution
Two more days of rain, Dhingana, administration says caution
Updated on

नगर ः पावसाने यंदा चांगलंच मनावर घेतलं आहे. जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. आता उघडीप मिळावी अशी अपेक्षा आहे. मात्र, पावसाचा मुक्काम वाढतो आहे. पावसाचा धिंगाणा थांबण्याचे नाव घेत नाही

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. 15) अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला आहे. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. 

प्रसिद्धीपत्रकात निचित यांनी म्हटले आहे, की हवामान विभागाने जिल्ह्यात गुरुवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 805.06 मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या 179.62 टक्‍के इतका हा पाऊस आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून 404 क्‍यूसेक, मुळा धरणातून मुळा नदीस 600 क्‍यूसेक, सीना धरणातून नदीस 364 क्‍यूसेक, भीमा नदीस दौंड पूल येथे 3882 क्‍यूसेक व घोड नदीस 300 क्‍यूसेकने विसर्ग सुरू आहे. 

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीतील विसर्गदेखील वाढण्याची शक्‍यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे, की स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. नदी अथवा ओढ्या-नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास, पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. धोकादायक इमारतीत आश्रय घेऊ नये. आपत्कालिन परिस्थितीत संपर्क - 1077 (टोल फ्री), 0241-2323844 किंवा 2356940. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com