
विविध देशांत विक्रीची मान्यता व त्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण कसे राखता येईल, यावर प्रकाश टाकण्याचे काम ड्रग रेग्युलेटरी अफेयर्स शाखा करते. त्यामुळे देशात अशा स्पेशलायझेशन असणाऱ्या एम. फार्म्सची मागणी वाढत आहे.
कोपरगाव ः कोविड लसनिर्मिती कंपन्यात स्पर्धा लागली आहे. लस तयार करणाऱ्या फार्मासिटीकल बायोटेक्नॉलॉजी शाखेचे महत्त्व जगाच्या लक्षात आले. भविष्यात बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्यानेच औषधनिर्मिती होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ही बाब लक्षात घेऊन संजीवनी कॉलेज ऑफ फार्मासीटीकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये यंदापासून एम.फार्मसीच्या स्पेशलायझेशनकरीता ड्रग रेग्युलेटरी अफेयर्स व फार्मासीटीकल बायोटेक्नॉलॉजी, या दोन नवीन शाखांना मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.
हेही वाचा - एक ओटा कर्डिले-तनपुरे संघर्षाचे कारण
ते म्हणाले, की दोन्ही शाखांसाठी प्रत्येकी 15 जागा उपलब्ध असतील. त्यासाठी एआयसीटीई व पीसीआय यांची मान्यता मिळाली. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश खुला आहे. औषधनिर्मितीसाठी आवश्यक ज्ञान असणाऱ्या मनुष्यबळाचा जगभरात तुटवडा आहे.
विविध देशांत विक्रीची मान्यता व त्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण कसे राखता येईल, यावर प्रकाश टाकण्याचे काम ड्रग रेग्युलेटरी अफेयर्स शाखा करते. त्यामुळे देशात अशा स्पेशलायझेशन असणाऱ्या एम. फार्म्सची मागणी वाढत आहे.
महाराष्ट्र राज्य प्रवेश नियंत्रण कक्षाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवेशप्रक्रियेनुसार एम.फार्मसीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी व अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
वेळापत्रकाप्रमाणे विकल्प (ऑप्शन) अर्ज सादर करून, इतर शाखांसह या दोन नवीन शाखांना प्रवेश घेता येईल. महाविद्यालयाने नोंदणी व प्रवेशअर्ज मार्गदर्शनासाठी सुविधा केंद्राची व्यवस्था केली असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.