esakal | टी.जी.तोरडमल अँड कंपनी आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने कोव्हिड सेंटरला ऑक्सिजन मशीन भेट

बोलून बातमी शोधा

गायकरवाडी कोविड सेंटरला अॉक्सीजन भेट
बहिरोबावाडीच्या तोरडमल परिवाराने कर्जतकरांसाठी दिला प्राणवायू
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

कर्जत (अहमदनगर) : येथील सामाजिक कार्यकर्ते कै.भास्कर (दादा) तोरडमल आणि कै. दिलीप (नाना) तोरडमल यांच्या स्मरणार्थ टी.जी.तोरडमल अँड कंपनी आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कोव्हिड सेंटरला दोन ऑक्सिजन मशीन भेट म्हणून देण्यात आल्या आहे. घरातील व्यक्तीची आठवण म्हणून तोरडमल परिवाराच्या वतीने केलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या वेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानसाहेब आगळे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, गट विकास अधिकारी अमोल जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, निवृत्त वन अधिकारी अनिल तोरडमल, बहिरोबावाडी सरपंच विजयकुमार तोरडमल, राष्ट्रवादी डॉकटर्स सेलचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश तोरडमल, बांधकाम व्यावसायिक रमेश तोरडमल, अभियंता अमित तोरडमल, भाऊसाहेब रानमाळसचिन जाधव, नितीन तोरडमल, विशाल म्हेत्रे, नितीन देशमुख, नवनाथ लष्कर,आप्पासाहेब लाळगे आदी उपस्थित होते.

प्रांत अर्चना नष्टे म्हणाल्या, कोरोना पार्श्वभूमीवर तोरडमल परिवाराने घरातील निधन झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ कोव्हिड सेंटरला ऑक्सिजन मशीनची दिलेली भेट व वृक्ष संवर्धनाचा घेतलेला वसा निश्चितच प्रशसनीय आहे.

या माध्यमातून त्यांचे कार्य आणि प्रेरणा जिवंत राहील. याचा आदर्श इतरांनी घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

सामाजिक कार्यकर्ते कै.भास्कर(दादा) तोरडमल आणि कै. दिलीप (नाना) तोरडमल यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ दरवर्षी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात येते परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, या वर्षी तोरडमल परिवाराने आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवला आहे. या वर्षी टी.जी.तोरडमल अँड कंपनी आणि सर्व सामाजिक संघटना यांनी संयुक्त विद्यमाने कर्जत अमरापूर रस्त्यावरील बहिरोबावाडी गावातील रस्ता दुभाजकात झाडे लावण्याचे काम करण्यात आले व त्याचे संगोपन टी.जी.तोरडमल अँड कंपनी करणार आहे.

तालुक्यात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे तुटवडा कमी करण्यासाठी प्रशासनाने समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन मशीन द्याव्या, असं आवाहन केलं होत. त्याला प्रतिसाद देत तोरडमल कुटुंबीयांनी दोन ऑक्सिजन मशीन कोविड सेंटरला दिल्या आहेत. प्रास्ताविक अनिल तोरडमल यांनी केले तर आभार विजय तोरडमल यांनी मानले.

कै.भास्कर(दादा) तोरडमल आणि कै. दिलीप (नाना) तोरडमल यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ माहि जळगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुभम हॉस्पिटलमध्ये डॉ. राजेश तोरडमल आणि कीर्ती तोरडमल दाम्पत्याच्या वतीने मोफत सर्व रोग निदान आणि कोरोना प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बातमीदार - नीलेश दिवटे