esakal | Ahmednagar : ‘समुदाय’ची खासगी प्रॅक्टिस जोमात
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

Ahmednagar : ‘समुदाय’ची खासगी प्रॅक्टिस जोमात

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आरोग्यसेवा पुरविली जाते. मात्र, सध्या ग्रामीण भागातील उपकेंद्रांत नियुक्तीस असलेले समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याच्या व खासगी प्रॅक्टिस करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर प्रशासनाकडून कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जिल्ह्यात एक हजार ५९६ गावे असून, या सर्व गावांतील नागरिकांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाची ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५५५ उपकेंद्रांमार्फत आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४०९ उपकेंद्रांमध्ये एकूण ३८२ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यामधील काही जण खासगी प्रॅक्टिस करीत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. काही जण नियुक्तीच्या ठिकाणी न राहाता येऊन-जाऊन करत आहेत. त्यामुळे नागरिकांना तातडीने प्राथमिक उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

याच मुद्द्यावर अनेकदा आरोग्य समितीच्या सभेत चर्चा झाली आहे. ज्या भागातील तक्रारी आहेत, त्याबाबत संबंधित तालुका अधिकाऱ्यांना सूचना देऊन कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सूत्रांकडून समजते.

हेही वाचा: भिंगारमध्ये आगीचे तांडव

प्राथमिक आरोग्य केंद्र - ९८

  1. उपकेंद्र - ५५५

  2. मंजूर समुदाय आरोग्य अधिकारी पदे - ४०९

  3. कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी - ३८२

हेही वाचा: नगर जिल्ह्यात सर्वदूर परतीचा दमदार पाऊस

कोरोनाचे रुग्ण गावागावांत सापडत आहेत. या काळात ग्रामीण भागात तत्काळ आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उपकेंद्रांतील समुदाय आरोग्याधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहून नागरिकांना आरोग्य सुविधा देणे गरजेचे आहे. जे कोणी खासगी प्रॅक्टिस करीत असतील, त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी.

-पंचशीला गिरमकर, सदस्य, आरोग्य समिती, जिल्हा परिषद

सर्वांनी कोरोनाच्या काळात नियुक्तीच्या ठिकाणी राहणे गरजेचे आहे. जे नियुक्तीच्या ठिकाणी राहणार नाहीत, त्यांच्यावर व जे खासगी प्रॅक्टिस करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

-प्रताप शेळके, उपाध्यक्ष, तथा सभापती आरोग्य समिती, जिल्हा परिषद

loading image
go to top