शिर्डीत लाचप्रकरणी अडकले दोन पोलिस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

शिर्डीत दोन पोलिसांना लाचेच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले.

नगर ः लाचेच्या गुन्ह्यात शिर्डी पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना आज नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. बाळासाहेब यशवंत सातपुते (वय 38) व प्रसाद पांडुरंग साळवे (वय 49) अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

17 ते 25 जानेवारीदरम्यान शिर्डीतील हॉटेलवर कारवाई सुरू होती. ही कारवाई टाळण्यासाठी वरील कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे झाली होती.

त्यानुसार शिर्डी पोलिस ठाण्यात सापळा रचून बाळासाहेब सातपुते याला दोन हजारांची लाच घेताना पथकाने पकडले. सहकारी प्रशांत साळवे यांच्या सांगण्यावरून ही लाच घेतल्याचे त्यांनी सांगितल्याने लाचलुचपत विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two policemen caught in Shirdi bribery case