
सिद्धटेक : अहिल्यानगर दक्षिणेतील तीन तालुक्यांसाठी वरदान असलेले उजनी धरण ७५ टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील संततधार पावसामुळे भीमा नदीसह तिच्या उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. परिणामी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उजनी धरणाची पाणीपातळी ७५ टक्क्यांवर गेली आहे. दरम्यान, आज सकाळी दौंड येथून भीमा नदीपात्रात ३६ हजार ५२२ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू होता. त्यामुळे खबरदारी म्हणून ‘उजनी’तून भीमा नदीपात्रात १६ हजार क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.