
सिद्धटेक : भीमा नदीकाठ तसेच उजनी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. उजनी धरणाचे फुगवटा क्षेत्र रुंदावले आहे. मागील २४ तासांत सुमारे पाच किलोमीटर क्षेत्रावर पाणीसाठा विस्तारला आहे. या परिसरात संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. काल धरणाचा पाणीव्याप्त परिसर ३१४.९० चौरस किमी होता. आज सकाळी तो ३१९ चौरस किमीपेक्षा जास्त होता.