
राशीन: उजनी प्रकल्प पुनर्वसनांतर्गत शिंपोरा (ता. कर्जत) शिवारातील नांदणी नदीवरील कोट्यवधींचा पूल केवळ पाच वर्षांतच कोसळला. ५० वर्षे टिकण्याचा दावा असलेला हा पूल २५ मे रोजी पावसात पत्त्याच्या पानासारखा वाहून गेला. याप्रकरणी ठेकेदार मोहन दामोदर गोडसे (बजरंगबली कन्स्ट्रक्शन, थेरवडी) याच्यावर कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.