
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जिल्हास्तरावर अद्ययावत अशा उमेद मॉलची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मॉल’ची उभारणी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.