विनापरवानगी खोदकाम करून पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ शासकीय कामात अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unauthorized excavation abusing police officer pushing obstructing government work

विनापरवानगी खोदकाम करून पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ; शासकीय कामात अडथळा

राहुरी : तांभेरे येथे काल (मंगळवारी) वादग्रस्त ठिकाणी विनापरवानगी खोदकाम करून, झेंडा उभारणार्‍या जमावाने पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी काल बारा व आज एक अशा तेरा जणांना राहुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना आज (बुधवारी) राहुरी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

काल (मंगळवारी) रात्री उशिराने याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर गर्जे यांच्या फिर्यादीवरून १२ पुरुष व १९ महिला अशा ३१ जणांसह अज्ञात दहा-बारा जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. स्वप्नील भारत तांबे (वय २१), प्रसाद सुधाकर तांबे (वय २९), शुभम अंतोन तांबे (वय २७), चंद्रकांत उर्फ श्रीकांत गोरख तांबे (वय २९), वैभव बाजीराव चोखर (वय १९), संजय सोन्याबापू कांबळे (वय २२), दीपक दिनकर तांबे (वय ४०), मार्तंड माधव तांबे (वय २३), राजू आनंदा तांबे (वय २३), अशोक बाबूराव तांबे (वय ५७), अक्षय अशोक तांबे (वय २२), अजित पोपट तांबे (वय ३२), दादासाहेब ऊर्फ दाविद प्रल्हाद कांबळे (वय ३२, सर्वजण रा. तांभेरे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना महिलांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

तांभेरे येथे विनापरवानगी झेंडा उभारण्यासाठी जमावाला चिथावणी देणाऱ्या सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात जातीयतेढ निर्माण करणारे, जातीयद्वेषाच्या भावना भडकविणारे मेसेज, व्हिडिओ पसरविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल केले जातील. - प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक, राहुरी.

Web Title: Unauthorized Excavation Abusing Police Officer Pushing Obstructing Government Work Rahuri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..