शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स बोर्डने घेतला तरुणाचा बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर : शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स बोर्डने घेतला तरुणाचा बळी

अहमदनगर : शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स बोर्डने घेतला तरुणाचा बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : वाढदिवसाचा फ्लेक्‍स बोर्ड लावत असताना तरुणाला विजेचा धक्का बसला आणि यात त्याचा मृत्यू झाला. सौरभ सुरेश चौरे (वय 22, रा. नालेगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात गुरूवारी (ता. 26) पहाटे ही घटना घडली.

हेही वाचा: हनीमूनला कुठेही जा; पण 'या' 8 गोष्टी लक्षात ठेवा

अहमदनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढदिवस, दशक्रिया विधी, निवडीचे अनधिकृत फ्लेक्‍स बोर्ड लावले जातात. याकडे महापालिका प्रशासनाने हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. सौरभ चौरे गुरुवारी पहाटे प्रोफेसर कॉलनी चौकात वाढदिवसाचे फ्लेक्‍स लावत होता. त्याला विजेचा धक्का लागल्याने तो जमिनीवर कोसळला.

त्याच्या डोक्‍याला मार लागला होता. जखमी सौरभला उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक उपनिरीक्षक केदार पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top