कर्जत : शेतकऱ्याचे थकीत वीज, पीक कर्ज खातेदाराला कल्पना न देता त्याच्या बचत खात्यातून कर्ज खात्यात वर्ग केल्याचा प्रकार तालुक्यातील माहिजळगाव येथील महाराष्ट्र बँकेत घडला आहे. या खातेदाराचे नाव यशवंत लवांडे (रा. सीतपूर, ता. कर्जत) असून, ते दिव्यांग आहेत. याबाबतीत न्याय मिळण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.