नगरच्या डॉ. शिवाजी पवार यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

अमित आवारी
Thursday, 13 August 2020

डॉ. पवार नगरचे सुपुत्र आहेत. केंद्रीय उत्पादनशुल्क विभागातील निवृत्त अधीक्षक मानसिंग पाटील व टायनी टॉट्‌स नर्सरी स्कूलच्या संचालिका मीरा पाटील यांचे ते जावई आहेत.

नगर : गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे.

देशातील 121 अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले असून, त्यांत महाराष्ट्रातील 10 अधिकाऱ्यांमध्ये डॉ. पवार यांचा समावेश आहे.

पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात एल्गार परिषदेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा डॉ. पवार यांनी सखोल तपास केला. मुंबई, नागपूरसह दिल्ली, हैदराबाद, गोवा आदी ठिकाणी छापे घालून पुरावे गोळा केले.

हेही वाचा - इतिहासात प्रथमच असं घडतंय

नक्षलवादी चळवळीशी संबंधित संशयित आरोपींना अटक केली. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. राजकीय वातावरण तापलेले असतानाही, डॉ. पवार यांनी अत्यंत सचोटीने या गुन्ह्याचा तपास करीत आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. एक हुशार आणि तडफदार अधिकारी म्हणून डॉ. पवार यांची पोलिस दलात ओळख आहे.

डॉ. पवार नगरचे सुपुत्र आहेत. केंद्रीय उत्पादनशुल्क विभागातील निवृत्त अधीक्षक मानसिंग पाटील व टायनी टॉट्‌स नर्सरी स्कूलच्या संचालिका मीरा पाटील यांचे ते जावई आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2018पासून केंद्रीय गृहमंत्री पदक देण्यास सुरवात झाली. यंदा देशातील 121 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड झाली आहे. त्यांत महाराष्ट्रातील 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Home Minister Medal announced to Dr. Shivaji Pawar from Ahmednagar