प्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व

विलास कुलकर्णी
Sunday, 15 November 2020

प्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व घरोघरी पोचविण्याची कार्य डॉ. शेकोकार करीत आहेत.

राहुरी (अहमदनगर) : प्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व घरोघरी पोचविण्याची कार्य डॉ. शेकोकार करीत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेद शास्त्र बहुगुणी ठरले आहे, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

राहुरी फॅक्टरी येथे डॉ. शेकोकार हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय आर्युवेद दिन व आयुर्वेद चिकित्सा मार्गदर्शन शिबिर प्रसंगी खासदार लोखंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते. डॉ. अनंतकुमार शेकोकार, नगराध्यक्ष सत्यजित कदम, सुरेश वाबळे, रावसाहेब खेवरे, दत्तात्रेय ढूस, शिवाजी कपाळे, गणेश भांड, गोपालकृष्ण रत्नपारखी, मच्छिंद्र तांबे उपस्थित होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमदार कानडे म्हणाले, "कोरोना बरोबर अन्य जुनाट आजारांवर रामबाण आयुर्वेद उपचार पध्दतीशिवाय दुसरे कुठले शास्त्र परिपूर्ण नाही. डॉ. शेकोकार यांचा आयुर्वेद शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास आहे. त्याचा लाभ सामान्य नागरिकांना देण्यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असतो." नगराध्यक्ष कदम म्हणाले, 'देवळाली प्रवरा शहराच्या प्रत्येक भागात आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड होणे अपेक्षित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू."

उपस्थित नागरीकांना डॉ. शेकोकार हॉस्पिटलतर्फे आयुर्वेदिक उटणे व आयुष काढा वाटप करण्यात आले. डॉ. कांचन शेकोकार यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique importance to Ayurveda from ancient times