esakal | जामखेडमध्ये रोहितदादांमुळे विखे गटाचे राळेभात बिनविरोध, आता फैसला कुटुंबातच तात्या की अमोल?
sakal

बोलून बातमी शोधा

Unopposed in Ralebhat of Vikhe group at Jamkhed

आमदार रोहित पवारांच्या सूचनेवरून सोमवारी (ता.08) रोजी सुरेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांची पाचव्यांदा संचालक होण्याची इच्छा पूर्ण होईल.

जामखेडमध्ये रोहितदादांमुळे विखे गटाचे राळेभात बिनविरोध, आता फैसला कुटुंबातच तात्या की अमोल?

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : जामखेड येथील सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निमित्ताने राळेभात हे पाचव्यांदा संचालक म्हणून बँकेवर निवडून जाणार आहेत. तर दुसऱ्यांदा बिनविरोध संचालक होण्याचा त्यांना मानही त्यांना मिळेल. 

या संदर्भात अधिक माहिती अशी;  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक ज्येष्ठ संचालक जगन्‍नाथ तात्या राळेभात यांनी 'भाजप' कडून  सोसायटी मदतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरूध्द आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. 

हेही वाचा - भाजपच्या आमदार राजळे बिनविरोध होताच महाविकास आघाडीला भरते

रोहित पवारांच्या सूचनेवरून

आमदार रोहित पवारांच्या सूचनेवरून सोमवारी (ता.08) रोजी सुरेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. बेरजेच्या राजकारणामुळे तसा निर्णय झाल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांची पाचव्यांदा संचालक होण्याची इच्छा पूर्ण होईल.

१९९७पासून आहेत संचालक

राळेभात हे 1997पासून एक अपवाद वगळता तेवीस वर्षांपासून संचालक आहेत. यावेळी पाचव्यांदा संचालक होण्याचा मान राळेभात यांना मिळाला. राळेभात यांच्या सहकाराच्या राजकारणाची सुरुवात 1997साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बिनविरोध संचालक होऊन झाली होती. चार वेळा त्यांनी निवडणूक लढविली. एक वेळेचा अपवाद वघळता ते तीन वेळा विजयी झाले होते. दोन वेळा बिनविरोध असे मिळून पाचव्यांदा संचालक झाले आहेत.

उपाध्यक्षपदाचा मान...

दुसरे म्हणजे राळेभात तात्यांचे चिरंजीव अमोल यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अर्ज निर्धारित वेळेपूर्वी माघारी घेता आला नाही. त्यामुळे तेही सध्या तरी रिंगणात आहेत. दोघांपैकी एकाने कोणी माघार घेतली तरच ते बिनविरोध होतील. तात्यांनी चिरंजीव अमोल यांना संधी दिली तर गणितं पुन्हा बदलतील. तात्या निवडून आले तर उपाध्यक्षपदाचा मान मिळू शकतो, तोही त्यांच्या कुटुंबात विचार होऊ शकतो.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image