
संगमनेर : तालुक्यातील सावरगाव तळ गावाला बुधवारी (ता.२) दुपारी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे गहू, कांदा, हरभरा, उन्हाळी बाजरीसह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर ओढे - नाले वाहू लागले असून, शेतांमध्ये पाणीच पाणी साचले होते.