
-राजू नरवडे
संगमनेर : मे महिन्यात कोरड्या हवामानाची अपेक्षा असताना झालेल्या मुसळधार पावसाने संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला. शेतातच साठवलेला कांदा ओलाव्यामुळे सडू लागला असून, काजळीमुळे साठवण्यायोग्य देखील राहिलेला नाही. परिणामी, मिळेल त्या भावाने कांदा विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी व्यथा अनिल कढणे या शेतकऱ्याने व्यक्त केली.