esakal | दुग्ध व्यवसाय व शेतीसाठी लागणारी जनावरे ही खरी शेतकऱ्यांची संपत्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination campaign in Parner taluka by Central Government sponsored Veterinary Department

पशुधन हे शेतकऱ्यांचे खरे दैवत आहे. दुग्ध व्यवसाय व शेतीसाठी लागणारी जनावरे ही खरी शेतकऱ्यांची संपत्ती असून त्याच्या जीवावरच शेतकऱ्यांचे जीवन अवंलंबून असते.

दुग्ध व्यवसाय व शेतीसाठी लागणारी जनावरे ही खरी शेतकऱ्यांची संपत्ती

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : पशुधन हे शेतकऱ्यांचे खरे दैवत आहे. दुग्ध व्यवसाय व शेतीसाठी लागणारी जनावरे ही खरी शेतकऱ्यांची संपत्ती असून त्याच्या जीवावरच शेतकऱ्यांचे जीवन अवंलंबून असते. शेतकऱ्यांचे आपल्या जानावरांवर जीवापाड प्रेम असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जनावारांच्या संरक्षणासाठी साथीच्या रोगाचे नियंत्रण व्हावे म्हणून लसीकरण मोहिमेत सहभाग होऊन जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी केले.

केंद्र सरकार पुरस्कृत पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण व्हावे. यासाठी पारनेर येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने एक ते 15 सप्टेंबरपर्यंत लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी शेळके बोलत होते. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, तालुक आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, तालुका दुध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, पशूचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्युक्त डॉ. ए. आर. बोठे, डॉ. हर्षदा ठुबे, डॉ. सुभाष झावरे, डॉ. नितीन गाडीलकर, डॉ. एस. एस. गवारे, डॉ. पी. एन. मापारी, डॉ. ए. व्ही. पवार उपस्थीत होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेळके म्हणाले, शेती व्यवसाय व दुध व्यवसाय यात जनावरांना खूप महत्व आहे. त्यासाठी जनारांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून त्यासाठी लसीकरण करून घ्यावे.

तहसीलदार देवरे म्हणाल्या, जनावरांमध्ये साथीचे रोग पटकन पसरतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. गाय किंवा म्हैस आजारी पडली तर दुध उत्पदनात घट होते. तसेच साथीच्या आजारात कधी कधी जनावर दगावते त्यासाठी शेतक-यांनी साथीच्या रोगापासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे व कोणीही टाळाटाळ करू नये असेही देवरे म्हणाल्या.

संपादन : अशोक मुरुमकर