esakal | संगमनेर शहरात होणार ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण : नगराध्यक्ष तांबे
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

संगमनेर शहरात होणार ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (जि. नगर) : नगरपरिषदेच्या वतीने कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शहरातील ज्येष्ठ पाचशे नागरिकांना रविवारी (ता. ११) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलत प्राधान्याने लसीकरण (Vaccination) करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. (Vaccination-of-senior-citizens-in-sangamner-nagar-corona-news)

लसीकरण हाच प्रभावी उपाय

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे राबवीत ही लाट यशस्वीपणे रोखण्यात पुढाकार घेतला होता. दुसऱ्या लाटेत (Second Wave) अनेक जण कोरोनाबाधित झाले होते. यावर लसीकरण हा प्रभावी उपाय असून, शहरात प्रभागनिहाय लसीकरण करण्यात येत आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण तातडीने व प्राधान्याने व्हावे, यासाठी रविवारी (ता. ११) सकाळी १० वाजता लसीकरणाला सुरवात होणार आहे. यासाठी तीन बूथ तयार करण्यात आले असून, ६० वर्षांपुढील नागरिकांना पहिला, तसेच दुसरा डोस देण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी केले आहे.

(Vaccination-of-senior-citizens-in-sangamner-nagar-corona-news)

हेही वाचा: ग्रामीण भागातील कोरोना थांबता थांबेना; रोजच पाच ते दहा बाधित

loading image