esakal | ग्रामीण भागात कोरोना थांबता थांबेना; एकाच कुटुंबातील 5 जण पॉझिटिव्ह!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

ग्रामीण भागातील कोरोना थांबता थांबेना; रोजच पाच ते दहा बाधित

sakal_logo
By
टिम ई सकाळ

येवला (जि. नाशिक) : सर्वत्र दुसरी लाट (Corona second wave) ओसरत असून शहर तालुक्यानेही या लाटेला बऱ्यापैकी नियंत्रित केले आहे. शहरात तर रोज हा आकडा शून्य किंवा एकवर मर्यादित असताना ग्रामीण भागात मात्र रोजच पाच ते दहाच्या दरम्यान कोरोना बाधीत निघत असल्याने चिंता वाढतच आहे. राजापूर येथे तर एकाच कुटुंबातील पाच जण बाधित निघाल्याने या परिसरात पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे. (Corona-positivity-rate-increase-in-rural-areas-nashik-marathi-news)

ग्रामीण भागात मात्र बधितांचा आकडा वाढताच

पहिल्या लाटेत शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. दुसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात तरी हीच अवस्था होती. मात्र गेल्या एक ते दीड महिन्यापासून शहरातील संख्येवर अचानकपणे नियंत्रण आले आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन रुग्ण शहरात निघतात, याउलट ग्रामीण भागात मात्र बधितांचा आकडा रोजच वाढत आहे. ५ ते १० च्या आसपास संख्या रोजच सुरु असून ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात केव्हा येणार याची प्रशासनासह नागरिकांना चिंता लागली आहे. राजापूर येथे विवाह समारंभासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण बाधित निघाल्याने या परिसरात तर चिंतेत अजूनच वाढ झाल्याने नागरिक दक्ष झाले असून काळजी घेतली जात आहे.

हेही वाचा: नाशिकरांच्या सेवेत शहर बस सेवा; बघा बसची खास वैशिष्ट्ये!;व्हिडिओ

नागरिकांचीही साथ मिळणे गरजेचे आहे

ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असल्याने गर्दी व संपर्क कमी असला तरी हार्ड इम्युनिटी (Hard immunity) व लसीकरणाचे (Vaccination) प्रमाण अल्प असल्याने बाधितांच्या आकडा वाढत आहे. गंभीर म्हणजे ग्रामीण भागातील अनेक नागरिक मास्क व सामाजिक अंतराचे नियम पायदळी तुडवत असल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचा दावा होत आहे.

"खेड्यापाड्यातील रुग्ण संख्या शून्यावर येत नसल्याने आता सर्वांची जबाबदारी वाढली आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लसीकरण, मास्कच्या बाबतीत निष्काळजीपणा करतात. नागरिकांनी शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे. घराबाहेर पडल्यावर मास्क वापरावा, वेळोवेळी सॅनीटायझर फवारणी करावी, लग्न-समारंभात होणारी गर्दी टाळावी." -डॉ.सुधीर जाधव, माजी सभापती, बाजार समिती येवला

हेही वाचा: नाशिकची सई ‘नासा’ची सिटिझन सायंटिस्‍ट!

★असे आहेत आकडे

आत्तापर्यंत बाधित - ५४८१

(शहर - १३६१,ग्रामीण - ४१२०)

बरे झालेले - ५१७९

(शहर - १३०१,ग्रामीण - ३८७८)

एकूण मृत्यू - २४७ (शहर - ५८,ग्रामीण - १८९)

उपचार घेणारे - ५५

★ग्रामीण भागात निघालेले रुग्ण...

दि. - बाधित

जून जूलै

२४ - ५ १ - ३

२५ - ६ २ - ५

२६ - १ ३ - ५

२७ - ४ ४ - ६

२८ - २ ५ - ९

२९ - ६ ६ - ९

३० - ४ ७ - ४

(Corona-positivity-rate-increase-in-rural-areas-nashik-marathi-news)

loading image