
याबाबत माहिती अशी की, आमदार निलेश लंके गटाने परीवर्तन पॅनल नावाने सर्व ११ जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. आमदार लंके यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यात बहुतांश चर्चा झालेली वासुंदा ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ११ पैकी ८ जागा जिंकून बहुमत मिळाले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याबाबत माहिती अशी की, आमदार निलेश लंके गटाने परीवर्तन पॅनल नावाने सर्व ११ जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. आमदार लंके यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जाहीर सभा घेत घराणेशाहीवर आरोप करत प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून होते. झावरे यांनीही स्व.माजी आमदार वसंतराव झावरे पाटील पॅनलच्या माध्यमातून जाहीर सभा, वैयक्तिक गाठीभेटी, गावात केलेले विकासकामे यावर भर देत पॅनलचे उमेदवार निवडून देण्याची विनंती गावातील मतदारांना केली होती.
हे ही वाचा : शनिभक्तांना 'लटकूं'च्या त्रासाची साडेसाती; पोलिस कारवाईला येतंय हद्दीचे विघ्न
झावरे यांच्याकरीता ही निवडणूक अंत्यत महत्त्वाची मानली जात होती. आगामी येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचे पडसाद निश्चित उमटणार होते. झावरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांना मतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून ही ग्रामपंचायत झावरे गटाच्या ताब्यात आहे.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
स्व.माजी आमदार वसंतराव झावरे पाटील पॅनलचे विजयी उमेदवार व मतदान
रामदास झावरे (५७९), शंकर बर्वे (५८५), संजीवनी शिर्के (५४४), किशोर साठे (६१७), नाभाबाई केदार (६११), सुमन सैद (५९४), बाळासाहेब शिंदे (२६०),
विमल झावरे (३१२)
परीवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार व मतदान
पोपट साळुंखे (३२२), छाया वाबळे (३०७), किसाबाई उगले (३१४)
लोकप्रतिनिधींनी पदाचा दर्जा घालवला
लोकप्रतिनिधींनी एखाद्या ग्रामपंचायतमध्ये उमेदवार निवडणे, बुथ ते बुथ नियोजन करणे, जाहीर सभा, मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणे हे कितपत योग्य आहे. आमदार निलेश लंके यांनी आपल्या पदाचा दर्जा घालवला असून सर्वात अधिक वेळ देत तरीही मतदारांनी त्यांच्या मतदारांना नाकारले आहे.
- सुजित झावरे पाटील