
नेवासे फाटा : स्व. साहेबराव घाडगे यांनी स्थापित केलेल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एफवाय बीएसस्सीचा विद्यार्थी वेदांत नितीन वाघमारे याची कझाकिस्तान येथे आयोजित आशियाई चॅम्पियनच्या रायफल शूटिंगसाठी निवड झाली. वेदांतच्या निवडीने घाडगे साहेबांच्या स्वप्नपूर्तीकडे आणखी एक यशस्वी पाऊल असल्याचे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगे यांनी व्यक्त केले.