
पारनेर : वाहनांच्या सुरक्षिततेसाठी व वाहनांच्या चोऱ्यांना आळा बसावा या साठी तसेच ज्यांच्या वाहनांची चोरी होते, त्यांचे नुकसान टाळावे व चोऱ्यांना आळा बसावा यासाठी राज्य परिवहन विभागाने जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचे नव्याने आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक वाहन मालकांना वाहनांना युनिक आयडी असलेली नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. त्यामुळे जुन्या वाहन धारकांना विनाकारण आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.