
तालुक्यातील मुळा व प्रवरा नद्यांतून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना पथकाने 9 वाहने पकडली.
राहुरी : वाळूचोरी प्रकरणात महसूलच्या पथकाने जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी मालक फिरकत नाहीत. अशा वाहनांचे लिलाव करून थकबाकीच्या वसुलीचा निर्णय तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी घेतला आहे.
त्यानुसार, 21 जानेवारीला सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात दंडात्मक थकबाकीच्या 9 लाख 86 हजार 908 रुपये वसुलीसाठी नऊ वाहनांचे लिलाव होणार आहेत.
हेही वाचा - नाद केला पण अंगलट आला
तालुक्यातील मुळा व प्रवरा नद्यांतून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना पथकाने 9 वाहने पकडली. त्यांत एक ट्रॅक्टर व ट्रॉली, एक डंपर व 7 टेम्पोंचा समावेश आहे. त्यांच्याकडे 9 लाख 86 हजार 908 रुपयांची थकबाकी आहे.
मात्र, जप्त वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कारवाई आदेशातील रक्कम शासनजमा केलेली नाही. या वाहनांचा लिलाव करून रक्कम वसूल केली जाणार आहे, असे तहसीलदार शेख यांनी सांगितले. अहमदनगर