संगमनेरच्या वैभवात भर! मंत्री थोरात व आमदार तांबें यांच्या मार्गदर्शनाने व्हर्टिकल गार्डन

आनंद गायकवाड
Friday, 11 December 2020

संगमनेर नगरपालिकेने हरित शहर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर शहरात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे मार्गदर्शन व नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या कुशल नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेने हरित शहर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यात भर टाकताना शहराचे सौंदर्य वाढवणाऱ्या व्हर्टिकल गार्डनमुळे शहराच्या आकर्षणात वाढ झाली असून वैभवात भर पडली आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्वच्छ, सुंदर व हरित संगमनेरची संकल्पना साकारण्यासाठी नगरपरिषदेने सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. त्याच बरोबर नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्नही असतो. या अंतर्गत स्वच्छ पाणी पुरवठा, हायटेक बसस्थानक, शहरातील विविध प्रभागात साकारलेल्या 25 बागा, भुमिगत गटार योजना, प्रवरेच्या घाटांचे सुशोभिकरण अशा कामांसह वैभवशाली प्रशासकीय इमारती, शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा यामुळे संगमनेर शहर राज्यात अग्रगण्य शहर ठरत आहे.

नगरपरिषदेने नव्याने शहरातील बसस्थानकासमोरील नवीन नगर रोड, सह्याद्री विद्यालयासमोर, तसेच नगरपरिषदेच्या प्रांगणात उभारलेले आय लव्ह संगमनेर हा तरुणाईला आकर्षणारा संदेश देणारी व्हर्टिकल गार्डन युवकांसाठी सेल्फी पॉईंट ठरत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vertical Garden under the guidance of Minister Thorat and MLA Tambe