
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमही सुरू आहे. तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही. हे लक्षात घेऊन महापालिकेने कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने दोन कोरोना सेंटर सुरू केली आहेत. यातील जैन पितळे बोर्डिंगमध्ये केवळ महिला रुग्णांवरच उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
अमृता फडणवीसांना रोहित पवार म्हणाले, ताई तुम्ही संधीचा योग्य फायदा घेतला
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमही सुरू आहे. तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही. हे लक्षात घेऊन महापालिकेने कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नटराज हॉटेल येथे 100 बेडची, तर जैन पितळे बोर्डिंग येथे 70 बेडची व्यवस्था केली आहे. मात्र, रुग्ण मोठ्या संख्येने घरीच उपचार घेत असल्याने, कोरोना सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण सध्या अतिशय कमी आहे.
उद्योजक हिरण हत्याप्रकरणी आयजींनी घातले लक्ष, तपासाची चक्रे वेगात
नटराज हॉटेलमध्ये केवळ दोनच रुग्ण उपचार घेत आहेत. जैन पितळे बोर्डिंगमध्ये अद्याप रुग्ण आले नाहीत. महापालिकेकडे उपचारासाठी पुरेशा प्रमाणात औषधेही आहेत. महापालिकेने ही सेंटर सुरू करण्यासाठी त्यांची स्वच्छता व सॅनिटायझेशन केले आहे. बेड व अन्य सुविधांवर खर्च केला असला, तरी या सेंटरना रुग्णांची अद्याप प्रतीक्षा आहे.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भेट
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच महापालिकेने, फक्त महिलांवर उपचार केले जातील असे कोविड सेंटर जैन पितळे बोर्डिंग येथे सुरू केले. या सेंटरमध्ये 70 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.