विखे पाटलांनी पुन्हा आळवला जनसेवा मंडळाचा राग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

विखे पाटील कोणत्याही पक्षात असले तरी त्यांना जनसेवा मंडळ हा त्यांच्यासाठी तसेच कार्यकर्त्यांसाठी पर्याय असतो. कार्यकर्त्यांची एकजूट करण्यासाठी त्यांनी नेहमी या पर्यायाचा विचार केला आहे.

श्रीरामपूर : तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणूक आपापसांत समन्वय ठेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले. मात्र, निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनसेवा मंडळाकडून लढवा, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब शिंदे, डॉ. नितीन आसने, अशोकचे संचालक बबन मुठे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, गणेश राठी, नगरसेवक बाळासाहेब गांगड आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी संवादाचे प्रक्षेपण करण्यात आले. 
 

अभिजित बनकर यांची निवड 

तालुक्‍यातील पढेगाव येथील अभिजित बनकर यांची नुकतीच ओमान मक्‍सद (दुबई) येथील फेरादिल ट्रेडिंग अँड कॉन्ट्रॅक्‍टिंग कंपनीमध्ये दोन वर्षासाठी निवड झाली आहे. अभिजित हे बॉयलर मॅकॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी युकेसेप्टी ही पदवी घेतली आहे. बॉयलर उत्पादन करणाऱ्या आर्य कंपनीतर्फे हिमाचल प्रदेश, पंजाब आणि मदुराई येथे त्यांनी काम केले. अभिजित सेवा संस्थेचे माजी अध्यक्षा सुनीता बनकर यांचा मुलगा तर कर सल्लागार प्रतीक बनकर यांचा भाऊ आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikhe Patil appeals to contest from Janseva Mandal