तहसीलदारांपासून जिवीतास धोका; शेवगावात पोलिसांकडे संरक्षणाची मागणी

सचिन सातपुते
Sunday, 27 December 2020

तहसीलदार या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन आपल्याला त्रास देत आहेत. त्यांच्यापासून पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी शहरातील विशाल बलदवा यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्याच्या तहसीलदार या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन आपल्याला त्रास देत आहेत. त्यांच्यापासून पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी शहरातील विशाल बलदवा यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

तालुक्यातील पिंगेवाडी येथून बेकायदेशीर वाळू तस्करीच्या अनुषंगाने आपण शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड यांच्या विरोधात चौकशीसाठी पाथर्डी येथील प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर २२ डिसेंबरला उपोषण केले. मात्र त्यानंतर तहसीलदारांनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन अप्रत्यक्षरीतीने धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भविष्यात काही विपरीत घटना घडण्याची शक्यता आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संबंधीत तहसिलदार यांचे अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध असल्याने त्यांच्या विरुध्दची चौकशी थांबवण्याकरीता अप्रत्यक्षरीतीने माझ्यावर दबाव निर्माण करीत आहेत. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी योग्य ती कारवाई करुन मला पोलीस संरक्षण दयावे. अन्यथा काही अनुचित घटना घडल्यास तहसिलदार जबाबदार राहतील. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व प्रांताधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishal Baldwa complaint against Tehsildar of Shevgaon to the police