नगर जिल्हा बँकेसाठी मतदारयादी जाहीर, लवकरच वाजणार बिगूल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची मुदत गतवर्षी संपली होती. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा बॅंकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली.

नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली. त्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटी 1371, पणन संस्था 832, तर बिगरशेती संस्था 1376, असे एकूण 3579 मतदार आहेत. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची मुदत गतवर्षी संपली होती. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा बॅंकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली.

हेही वाचा - विधवा भावजयीसोबत दिराची लग्नगाठ

नंतर कोविडमुळे ही निवडणूक पुन्हा लांबणीवर गेली. न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते. कोरोना प्रभाव कमी झाल्यानंतर बॅंकेच्या अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली. 

- तालुकानिहाय मतदार 
विविध सेवा सहकारी संस्था
: अकोले 84, जामखेड 47, कर्जत 74, कोपरगाव 114, नगर 109, नेवासे 131, पारनेर 105, पाथर्डी 80, राहाता 73, राहुरी 110, संगमनेर 135, शेवगाव 70, श्रीगोंदे 170, श्रीरामपूर 69. 

शेतीपूरक व शेतमाल प्रक्रिया व पणन : कर्जत 16, कर्जत 22, कोपरगाव 82, नगर 35, नेवासे 28, पारनेर 40, पाथर्डी 15, राहाता 77, राहुरी 37, संगमनेर 325, शेवगाव 26, श्रीगोंदे 32, श्रीरामपूर 14 एकूण 832. 

बिगरशेती संस्था : अकोले 58, जामखेड 48, कर्जत 64, कोपरगाव 132, नगर 222, नेवासे 85, पारनेर 79, पाथर्डी 29, राहाता 114, राहुरी 102, संगमनेर 230, शेवगाव 22, श्रीगोंदे 69, श्रीरामपूर 62. संस्था व 60 मतदार, असे 1376 मतदार आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voter list for Ahmednagar District Bank announced