

Aspirants Gear Up as Ahilyanagar Awaits Mayor Post Reservation
Sakal
-अरुण नवथर
अहिल्यानगर: महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप युतीने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. आता दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या पदासाठी आठ ते दहा जणांनी फिल्डिंग लावली आहे; परंतु आरक्षण सोडत जाहीर न झाल्याने त्यांची कोंडी झाली आहे. महापौरपदासाठी पुढील आठवड्यात आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठीही मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू आहे. यावेळी पाच ऐवजी सहाजणांना स्वीकृत म्हणून महापालिकेत जाण्याची संधी मिळणार आहे. आरक्षण जाहीर होताच महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.